महत्वाच्या बातम्या

 नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांचा तगडा बंदोबस्त


- विशेष मोहीम
- ड्रन्क अँड ड्राईव्हला लगाम लावणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळते. या उत्साहाच्या वातावरणात कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहे. पोलीस स्टेशन कडून नियोजनबद्ध बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे.

पोलीस स्टेशन हद्दीत ठीकठिकाणी फिक्स पाईन्ट व बॅरिगेड लावून नाकाबंदी करण्यात येणार असून, ड्रन्क ॲन्ड ड्राईव्हवर लगाम लावण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले आहे. बहुतांश पोलीस रस्त्यावर उतरून बंदोबस्त ठेवणार आहे. 

हद्दीत फिक्स पाईन्ट लावून वाहनांची तपासणी केली जाईल. शहरातील कलामंदिर, तीन एक्का गेट, काटा गेट, सुभाष टॉकीज चौक, बालाजी कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड, रेल्वे चौक, जुना बस स्टँड, बीटीएस प्लॉट चौक, गोल पुलिया, सातनळ चौक, महात्मा गांधी पुतळा येथे पोलिसांचे फिक्स पॉइंट राहणार असून शहरात तीन पेट्रोलिंग टीम गस्त घालत राहणार आहेत. रात्री उशिरापर्यंत डीजे वाजणार नाही याची दखल घेतली जाणार आहेत.

शहरात पोलिसांची विशेष नजर राहणार आहे नववर्षाच्या स्वागतावेळी दारू पिऊन वाहने चालविणारे अपघात घडवितात. त्याचेवर ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करण्यात येणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos