महत्वाच्या बातम्या

 विजेच्या धक्क्याने रानटी हत्तीचा मृत्यू : कुरखेडा तालुक्यातील घटना 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील वाढोणा परिसरात विजेच्या धक्क्याने रानटी हत्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.

मागिल वर्षा पासुन जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा उच्छाद सुरू असताना एका रानटी हत्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज, रविवारी सकाळच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाढोणा येथे उघडकीस आली.

गावालगतच्या शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता.
वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाढोणा परिसरात रानटी हत्तींचा कळप दाखल झाला. जंगलालगत असलेल्या एका शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता. दरम्यान, कळपातील एका मादी हत्तीला विजेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. कळपावर नजर ठेवणाऱ्या वनविभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यात दिसून आल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून विजेचा प्रवाह सोडणाऱ्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देसाईगंज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

३० डिसेंबर रोजी आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे एक वृद्ध महिलेचा बळी घेतल्यानंतर हा कळप कुरखेडा तालुक्यात दाखल झाला होता. उत्तर गडचिरोलीत रानटी हत्ती आणि वाघांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos