महत्वाच्या बातम्या

 तुळशी येथील साहिल रामटेके बनला शिक्षणमंत्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : पद्मश्री क्रांती शहा द्वारा स्थापित भारतातील नामांकित संस्था म्हणून ओळख असलेली युवक बिरादरी भारत ज्याचे अध्यक्ष म्हणून अभिषेक बच्चन कार्यभार सांभाळतात. या संस्थेद्वारे आयोजित माझा जाहीरनामा मंथन २०२४ परिचर्चा स्पर्धा डी.एन.सी. महाविद्यालय नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेअंतर्गत प्रथम फेरीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण शंभर स्पर्धकांनी सहभाग नोंदवत ऑनलाइन स्वरूपात आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. व त्यानंतर शंभर स्पर्धकांपैकी पंधरा स्पर्धकांची निवड ही अंतिम फेरीसाठी झाली. या अंतिम फेरीमध्ये चौदा स्पर्धकांना मागे टाकत साहिल साक्षकार रामटेके याने उत्कृष्ट व अभ्यासपूर्णपणे आपला शिक्षण मंत्र्याचा जाहीरनामा साहिल ने प्रस्तुत केला व प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. 

सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या जानेवारी २०२४ मध्ये मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय पातळीवर साहिल ची निवड झाली. या स्पर्धेला परीक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे उत्कृष्ट कवी व व्याख्याते पुनीत मातकर, नागपूरच्या उत्तम कवयित्री सावरकर व लोकसत्ता चे पत्रकार ठवरे त्याचबरोबर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्य आयोजक म्हणून निलेश सोनटक्के, सचिन वाकुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

स्पर्धेचे संचालन हे सुप्रसिद्ध सप्त खंजिरी वादक आकाश टाले यांनी केले. या यशाबद्दल साहिलचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos