महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये परिश्रम करून यश संपादन करा : खासदार रामदास तडस


- नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा देवळी अंतर्गत बालकीडा व सास्कृतीक महोत्सव संपन्न.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : शिक्षणामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो कारण क्रांती घडविण्याची ताकद शिक्षणातच आहे, सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षण शहराच्या तुलनेत मागे राहू नये म्हणून प्रगत शैक्षणिक धोरण राबविले जाते आहे. केंद्र व राज्याचे शैक्षणिक धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आहे. त्यासाठी शासनासोबतच शिक्षकांनीही उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे. शिक्षकांनी कल्पकतेतून गुणवत्ता वाढीसोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी निश्चितपणे चमकतील, विद्यार्थानी स्पर्धेमध्ये परिश्रम करून यश संपादन करा, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी देवळी येथे बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

देवळी येथे नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा देवळी अंतर्गत बालकीडा व सास्कृतीक महोत्सव कार्यकमाचे उद्घाटन खासदार रामदास तडस शुभहस्ते संपन्न झाले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. देवळीचे मुख्याधिकारी डॉ. सौरभ कावळे, ठाणेदार भानुदास पिदुरकर, माजी उपाध्यक्ष डॉ. नरेद्र मदनकर उपस्थित होते.

नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा देवळी येथे वर्ग १ ते १२ पर्यंतचा सर्व विद्यार्थाचे बालक्रीडा व सांस्कृतीक कार्यकम सपन्न झाला कबड्डी, लंगडी, क्रिकेट, लांब उडी, थाळी फेक, उंच उडी, १०० मीटर २०० मीटर धाव स्पर्धा व सास्कृतिक अशा विविध स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होवुण कला गुणाचे नैपुण्य व कौशल्य दाखवले.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुख्याध्यापक राजेंद्र मसराम यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन परमेश्वर केंद्रे व समीर चोरे यांनी केलेे तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्याक निलिमा कपुर यानी मानले, स्वागतगीत शाळेतील शिक्षक भंगवंतराव खडसे व संच यानी सादर केले. कार्यकमाचे उत्कृष्ट नियोजन पर्यवेक्षिका कल्पना मुंजेवार, कला शिक्षक मनोज बरडे, यानी केले खेळ व कीडा स्पर्धेचे नियोजन शारीरीक शिक्षक दिलीप तागडे, उज्जवला धोपट, प्रकाश पाचडे संजय चव्हान, यानी तर संपुर्ण कार्यक्रम व्यवस्थीत पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाला प्रा. विलास आडे, राम कदम, वर्षा मेश्राम, जिकत खॉन, गजानन साबळे, निरज जैस्वाल, संजय कुबडे, मिना कुंभारे, विद्या उईके, प्रविण गजभीये, प्रतिभा मेहरकुरे, वैशाली धवने, गुंजन कामडी, जया सिडाम, मयुरी मरसकोल्हे, अशोक झाडे, गणपत कुरवाडे, आकाश कुऱ्हाडकर, पवन खाडे उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos