महत्वाच्या बातम्या

 शासकीय औदोगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शासकीय औदोगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर तंत्र प्रदर्शनी मध्ये जिल्ह्यातील शासकीय व अशासकीय आयटीयातील विद्यार्थ्यांनी बनवलेले मॉडेल्स चे प्रदर्शन मांडण्यात आलेले आहे सदर तंत्र प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सदर तंत्र प्रदर्शन काल २९ डिसेंबर २३ ला ११ वाजेपासून तर ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हा प्रशिक्षण अधिकारी सोंकुवर साहेब संस्थेचे उपसंचालक प्रमोद ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात प्रा. अभय देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, डॉ. तेजराव घोरमाडे, शासकिय तंत्र निकेतन गडचिरोली, उपप्राचार्य चांदेकर, पुंड या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी ढूमणे तर सूत्र संचालन दिलिप मस्की आणि आभार सुरेंद्र दुबे यांनी केले.

या तंत्र प्रदर्शन मधे १०० मॉडेल आले होते. या मॉडेल मधुन स्टार्ट अप साठी नक्की फायदा मिळेल. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मॉडेल मधुन समाजाच्या आणि कारखान्याच्या पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीत नक्की मोलाची भूमिका बजावणार आहे भारतामध्ये सध्याच्या स्थितीत तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आयटीआय च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करत आहेत. त्यांनी आत्मसात केलेल्या अभ्यासातून तंत्र प्रदर्शनीमध्ये त्यांच्या बुद्धीचा आणि अनुभवाचा कस लागणार आहे आणि हेच मॉडेल उद्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात उद्योजकांना चालना देण्यासाठी मार्गदर्शक अशी भूमिका या तंत्रप्रदर्शनी च्या माध्यमातून मिळणार आहे. 

या प्रसंगी कमी वेळात विद्यार्थ्याना संस्थेतील सर्व शिल्प नीदेशक यांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मुलांनी दर्जदार मॉडेल्स तयार केले.





  Print






News - Nagpur




Related Photos