महत्वाच्या बातम्या

 एक जानेवारीपासून दर सोमवारी ईबीसी सवलत अर्ज तपासणी कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सन २०२३-२४ या वर्षाकरिता ईबीसी अर्जाची तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून रवी नगर परिसरातील शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी कार्यालयात ही तपासणी होणार आहे. दर सोमवारी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेखाधिकारी शिक्षण विभाग यांनी केले आहे.

शिक्षण विभागाने या संदर्भात जारी केलेल्या एका पत्रकामध्ये एक जानेवारी ते १५ मार्च या कालावधीमध्ये दर सोमवारी नागपूर शहर व ग्रामीण भागातील अर्जाची तपासणी केली जाणार आहे. नागपूर ग्रामीण व शहर विभागातील कनिष्ठ उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय व सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांनी या प्रक्रियेची नोंद घ्यावी. योग्य तपासणी केलेले अर्ज पाठवावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

नागपूर जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, सर्व कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय व विद्यापीठ शाखा यातील विद्यार्थ्यांचे शुल्क सवलतीच्या अर्ज तपासण्याची ही प्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरू राहील. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी अर्ज तपासणी करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos