महत्वाच्या बातम्या

 १५ जानेवारीपर्यत शेतकरी नोंदणीची मुदत


- धान उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे अकरा कोटीचे धानाचे चुकारे अदा : पणन विभागाची माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आधारभुत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम २०२३-२४ अंतर्गत धान  खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणी ३० नोव्हेंबर २०२३ व ३१ डिसेंबर २०२३ अखेर मुदत देण्यात आली होती. मात्र शासन निर्णयानुसार शेतकरी नोंदणीची मुदत वाढविण्यात आली असुन ती १५ जानेवारी २०२४ पर्यंत करण्यात आली असल्याचे पणन विभागाने कळवले आहे.

भंडारा जिल्हयात गेल्या हंगामाच्या तुलनेत अजुनही शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. तरी अशा सर्व शेतकऱ्यांना आधारभुत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळण्याकरीता आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी नोंदणी करताना खरेदी केंद्रावर जातांना १) चालू हंगामाचा धान पेरा असलेला ७/१२ उतारा २) आधार कार्ड ३) बैंक पासबुकची झेरॉक्स ४) मोबाईल क्रमांक या ऑनलाईन शेतकरी नोंदणी करतांना प्रत्यक्ष शेतकरी नोंदणी केंद्रावर हजर असला पाहिजे व नोंदणी करातांना शेतकऱ्यांचा लाईव फोटो (Live Photo) घेऊनच शेतकऱ्यांची नोंदणी करावयाची असून सदरील कागदपत्रासह नोंदणीस वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या खरेदी केंद्रावर मुदतीआधी जाऊन नावाची नोंदणी करून घ्यावी.

तसेच संबंधीत संस्थांनी नोंदणीकृत शेतकऱ्यांची धान खरेदी सुरू करावी, असे आव्हान जिल्हा पणन कार्यालय भंडारा कडून करण्यात येत आहे. तसेच २९ डिसेंबर २०२३ अखेर ७७ हजार ५३६ शेतकऱ्यांचे २४ लाख २१ हजार ८३३.७७ क्विं. धानाचे २११ कोटी ९६ लाख ५७ हजार ७२३.३७ रू. चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेले आहे. तसेच धान खरेदी करिता लागणारा बारदाना पुरविण्यात येत असून धान खरेदी बाबत तक्रारी नाहीत. असे जिल्हा पणन कार्यालयाने कळवले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos