महत्वाच्या बातम्या

 मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण सुधारित कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारतीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता. आयोगाने मतदार यादीचा विशेष पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम घोषित केला आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार शुक्रवार १२ जानेवारी रोजी दावे व आक्षेप निकाली काढणे, बुधवार १७ जानेवारी रोजी मतदार यादीचे हेल्थ पॅरामिटर तपासणे आणि अंतीम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे, डेटाबेस तयार करणे व पुरवणी याद्यांची छपाई करणे. सोमवार २२ जानेवारी रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्द करणे.

पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ४ नोव्हेंबर आर्वी, ५ नोव्हेंबर देवळी, २५ नोव्हेंबर हिंगणघाट व २६ नोव्हेंबर वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरामध्ये मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांचे नवमतदार, दुरुस्ती व वगळणीचे अर्ज भरुन घेण्यात आले. मतदारांची नावे नोंदणी अथवा आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos