मनमोहनसिंग राजस्थान मधून जाणार राज्यसभेवर, काँग्रेसची घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोणत्या राज्यातून राज्यसभेवर पाठवायचे हा काँग्रेसपुढे मोठा पेच होता. मात्र आज अखेर काँग्रेसने यावर तोडगा काढला असून मनमोहनसिंग हे राजस्थान मधून राज्यभेवर जातील अशी घोषणा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. ते येत्या १३ तारखेला जयपूर येथे जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यानंतर त्यांची निवड राज्यसभेवर निश्चित होईल.
मनमोहन सिंग यांच्या सारखा नेता राज्यसभेत पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पाहिजेच असा काँग्रेसची इच्छा होती . मात्र त्यांना त्यांची मुदत संपल्या नंतर कोणत्या पक्षातून राज्यसभेवर पाठवायचे हा मोठा प्रश्न काँग्रेस समोर उभा होता. कारण बऱ्याच राज्यात भाजपने सत्ता कमावल्याने मनमोहनसिंग यांना राज्यसभेत पाठवण्या इतपद संख्याबळ काँग्रेसकडे नव्हते. म्हणून काँग्रेसने त्यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे तेथील काँग्रेसचे संख्याबळ बघता मनमोहन सिंग सहज राज्यसभेवर निवडून जातील असे मानले जाते आहे. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ असे १० वर्ष देशाचे पंतप्रधान पद सांभाळले आहे. त्याआधी त्यांनी रिजर्व बँकेचे गव्हर्नर पद आणि देशाचे अर्थमंत्री पद देखील सांभाळले आहे. मनमोहनसिंग हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत.
  Print


News - World | Posted : 2019-08-10


Related Photos