'वन नेशन-वन रेशनकार्ड' प्रकल्पास महाराष्ट्रासह चार राज्यांत आजपासून सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
गरीबांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळावे, त्यांना सवलती मिळाव्यात आणि रेशन दुकानांमधील भ्रष्टाचाराला आळा बसावा या हेतूने 'वन नेशन-वन रेशनकार्ड' प्रकल्प सुरू देशभरात सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या प्रकल्पाला चार राज्यांत आजपासून सुरुवात झाली. शुक्रवारी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी या प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन केले. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांमध्ये प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून लवकरच संपूर्ण देशभरात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आता कुणीही एकापेक्षा अधिक रेशनकार्ड ठेवू शकणार नाही. तसेच मोठय़ा संख्येने गरीब, मजूरांना या योजनेचा लाभ घेता येईल. रेशन दुकानांमधील भ्रष्टाचार संपुष्टात येईल, असा विश्वास पासवान यांनी व्यक्त केला. मजूरवर्ग कामानिमित्त विविध जिह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये स्थलांतर करतात अशा गरीबांनाही आता या योजनेमुळे सरकारच्या सवलतींचा लाभ घेता येईल, असेही पासवान म्हणाले.
अन्न मंत्रालय देशभरातील सर्व रेशनकार्डांचा एक केंद्रीय डेटा तयार करणार आहे. त्यामुळे बनावट रेशनकार्ड कुणालाही काढता येणार नाहीत. इंटीग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पीडीएसअंतर्गत हा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि त्रिपुरामध्ये हा डेटा तयारही करण्यात आला आहे.  Print


News - World | Posted : 2019-08-10


Related Photos