महत्वाच्या बातम्या

 भाजपा चामोर्शी तालुक्याची सुपर वॉरियर्स ची बैठक संपन्न


- महाविजय २०२४ अंतर्गत सुपर वारीयर्सशी साधला प्रत्यक्ष संवाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भाजपा महाविजय २०२४ अंतर्गत गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यात लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात सुपर वारीयर्सची बैठक संपन्न झाली.

बैठकीत प्रमोद पिपरे यांनी सुपर वॉरियर्सशी प्रत्यक्ष संवाद साधत खालील विषयांवर सविस्तर चर्चा केली. विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक ३ बुथ मागे एक सक्षम सुपर वारीयर्स नेमणे, प्रत्येक सुपर वॉरियर्सला महाविजय २०२४ पुस्तकातील प्रत्येक मुद्दा व विषय माहीत असणे व ते सर्व मुद्दे दिलेल्या ३ बुथवर राबवून घेणे, तसेच प्रत्येक बुथ सक्षमीकरण करणे. यावेळी सक्षम सुपर वारीयर्सची माहिती गोळा करण्यात आली.

बैठकीला जिल्हा सचिव दिलीप चलाख, तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर, शहर अध्यक्ष सोपान नैताम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक राठी, तालुका महामंत्री विनोद गौरकर, संजय खेडेकर, विकास मैत्र, लोमेश सातपुते, काशिनाथ बुरांडे, लक्षण वासेकर, रामचंद्र वरवाळे तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, बुथ पालक, बुथ कार्यकर्ते उपस्थित होते.    





  Print






News - Gadchiroli




Related Photos