तुर व कापूस पिकाला मुळकुज रोगाची लागण, शेतशिवार जलमय,शेतकरी चिंतातूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / खांबाडा :
संपूर्ण जिल्ह्यात पंधरा दिवसापासून सततधार सुरू असलेल्या पावसाने शेतजमीन चिखलमय झाली असून शेतशिवार जलमय झाले आहे. यामुळे कापूस, तुर पिवळे पडून पाने गळून मरताना दिसत आहे. सततच्या पावसात कुठल्याही उपाययोजना शेतकरी वर्गाला करणे शक्य नसल्याने पिंकाचे नुकसान होत आहेत. याचा परिणाम उत्पादनावर निश्चितच होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
कृषी विभागाने वेळीच उपाययोजना आखण्याची गरज आहे मात्र याविषयी कृषी विभाग सुस्त आहेत. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अद्याप मार्गदर्शन किंवा माहिती दिल्या गेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. सततधार पावसाने शेतीकामे ठप्प असल्याने कुठल्याही उपाययोजना करणे जिकिरीचे होत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सततधार पाऊस असुन याचा फटका जीवश्रृष्टिवर होत आहे, सततधार पावसाने शेतशिवार जलमय झालेली आहे. काही ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतीचे आंतरमशागतीचे कामेही ठप्प आहे मजुरांना मजुरी मिळेनाशी झाली आहे. नदिनाल्यालगतचे शेतपिक पाण्याखाली डुबलेआहे मात्र प्रशासनाकडून शेतमाल नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश अद्यापहि दिलेले नाही हे नवलच आहे.
शेतकरी मनोगत 
माझ्या दोन एकर शेतात कापूस पिकावर मररोग आला आहे कापूस व तुरीचे झाड कोमजेलेले आहे. काही झाडाची पाने गळू लागली आहेत .सततधार पाऊस पडत असल्याने कोणत्याही उपाययोजना करणे शक्य नाही. यावर्षी कापूस उत्पादनावर परिणाम होणार आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-10


Related Photos