पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे बकरी ईद सनानिमित्य बैठक संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही :
पोलिस स्टेशन सिंदेवाहीमध्ये ईद-ऊल अजहा (बकरी ईद) सना निमित्य शांतता व सुव्यवस्थाच्या दृष्टीकोनातून पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली व  रणधीर मदारे (गोपनीय विभाग) यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बैठक संपन्न झाली.
सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके  यांनी बकरी ईद सनानिमित्य शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासमंधी योग्य मार्गदर्शन केले. 
याप्रसंगी जामा मस्जिद सिंदेवाहीचे अध्यक्ष ईस्माइल शेख, सचिव नासिर अंसारी, पुर्व सचिव  मो. युसुफ शेख, वहाबअली सय्यद, खालीद पठान, अमान क़ुरेशी, जाहिद पठान, फिरोज खान पठान, फजल शेख, नोमान क़ुरेशी तथा पत्रकार भागवंत पोपटे, विजय बलगेवार प्रामुख्याने उपस्थित होते तथा मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-10


Related Photos