आदिवासी विकास दौडमध्ये मुलांमधून आकाश शेंडे तर मुलींमधून शुभांगी किरंगे प्रथम


- जिल्हाभरातून नागरीकांचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आज ९ ऑगस्ट  रोजी गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आदिवासी विकास दौडचे आयोजन करण्यात आले होते. दौडमध्ये मुलांमधून आकाश देवाजी शेंडे तर मुलींमधून शुभांगी किरंगे हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
गडचिरोली पोलिस दलाच्या तीने जिल्हाभरात महिनाभरापासून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये १०  ते १२  हजार आदिवासी तरूण, तरूणींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतमध्ये सर्वोत्तम धावणार्या ४००  स्पर्धकांची निवड आज झालेल्या आदिवासी विकास दौडमध्ये करण्यात आली होती. सोबतच जिल्ह्यातील तरूण, तरूणी व सिआरपीएफचे जवान सहभागी झाले होते.
स्पर्धेची सुरूवात इंदिरा गांधी चौकातून  पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याहस्ते वीर बाबुराव शेडमाके व वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर पोलिस अधीक्षकांनी दौडकरीता हिरवी झेंडी दाखविली. इंदिरा गांधी चौक  ते सेमाना मार्गे टी पाॅईंट - पोलिस मुख्यालय असा दौडचा मार्ग होता. 
स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक गटातून ६ स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. यामध्ये मुलांमधून प्रथम आलेला आकाश देवाजी शेंडे याला १०  हजार रूपये रोख व सुवर्णपदक देण्यात आले. द्वितीय क्रमांक पटकाविलेला रितीक अजय पंचबुध्दे याला  ७  हजार रोख व रौप्य पदक देण्यात आले, तृतीय आलेला राकेश नारायण लोहंबळे याला ५ हजार रोख व कांस्य पदक देण्यात आले. 
मुलींमधून प्रथम आलेली शुभांगी किरंगे हिला १०  हजार रूपये रोख, सुवर्ण पदक देण्यात आले. द्वितीय आलेली काजल शंकर भरे हिला ७ हजार रूपये रोख व रौप्य पदक, तृतीय क्रमांक पटकाविलेली  वनिता हिचामी हिला ५ हजार रोख व कांस्य पदक देण्यात आले. तसेच इतरही स्पर्धक, सिआरपीएफ जवानांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. विशेष प्रोत्साहनपर प्रत्येकी १ हजार रूपयांचे बक्षिस देण्यात आले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-09


Related Photos