भामरागड येथे एसडीपीओ तानाजी बरडे यांना निरोप तर कुणाल सोनवाने यांचे स्वागत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
  येथील उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांची बदली पैठण येथे झाल्याने पोलिस ठाणे भामरागड आणि उप विभागीय पोलिस अधीकारी कार्यालय भामरागड यांच्या सयुंक्त विद्यमाने पोलिस ठाणे भामरागड च्या सभागृहात छोटेखानी निरोप समारंभ व नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवाने यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे  यांचा   नव्याने आलेले उप विभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर नव्याने आलेले उप विभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे  यांचे स्वागत करीत त्यांचाही सत्कार करण्यात आला.  तसेच भामरागड चे नायब तहसीलदार निखिल सोनवणे हे विक्रीकर आयुक्त म्हणुन बदलून जात असल्याने पोलिस स्टेशन भामरागड व  उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय भामरागड च्या वतीने सत्कार करण्यात आला.  बदलून जणारे तानाजी बरडे व नव्याने रुजू झालेले  निखिल सोनवणे यांना भविष्यातील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या.  
 कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक  संदीप भांड तसेच पोलिस निरीक्षक होनमाने  व पोलिस जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन पोलिस उप निरीक्षक झोल यांनी केले .  आभार  सूरज सुसतकर यांनी मानले.  कार्यक्रमच्या  यशस्वितेकरिता पोलिस जवानांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-09


Related Photos