महत्वाच्या बातम्या

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता बाळगावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : देशात व राज्यात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरी देखील सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी दक्षता बाळगावे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

देशात व राज्यात काही ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आले आहे. यावर उपाययोजना व प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी देखील बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. या ऑनलाईन आढावा बैठकीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहे. योबतच नागरिकांना देखील आवाहन केले आहे. कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास कोविड तपासणी करावी, हृदयरोगी, बीपी व डायबेटीज व इतर अतिजोखीमेच्या आजाराच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसुत्रींचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

आरोग्य विभागांनी कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी  डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून ठेवाव्या, अशा सूचना राहुल कर्डिले यांनी केल्या आहे.





  Print






News - Wardha




Related Photos