उमरेड - पवणी - कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्याचा विस्तार होणार : डॉ. परिणय फुके


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई़़  :
उमरेड- पवणी - कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्र वाढवून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करावे असे, निर्देश आज वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात बैठकीत दिले.
यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर,भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते तसेच वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी वन राज्यमंत्री डॉ. फुके म्हणाले, उमरेड - पवणी - कऱ्हांडला या गावांच्या भोवताली अरण्य परिसर वाढत आहे. परिसरात अभयारण्य वाढल्याने या परिसरातील गावात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. यासाठी काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरित करता येईल. उमरेड, पवणी येथील साधारण ६०५  कुटुंबांचे पुनर्वसन २९५  हेक्टर जमिनीत करता येणार आहे.
संबंधित गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे स्थलांतर करणे गरजेचे असल्याने उप विभागीय अधिकारी ( एस. डी.ओ)नेमण्यात यावा. यासंबंधी पुढील कारवाई करत असताना उमरेड-पवणी-क-हांडला या गावांमध्ये राहत असलेल्या गावकऱ्यांना स्थलांतराबाबत अधिसूचना उप विभागीय अधिकारी (एस डी ओ) यांनी द्याव्यात.या सुचनांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरासाठी संबंधित गावात राहणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अभरण्य क्षेत्र अधिसुचित करून व कक्षा वाढवून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे डॉ.फुके यांनी सांगितले.

   Print


News - Rajy | Posted : 2019-08-08


Related Photos