भारताबरोबर व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस रोखली


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द  केल्यानंतर पाकिस्तानने भारताबरोबर काल व्यापारी संबंध तोडले.   आता भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार आहे. भारतीय उच्चायुक्त अजय बिसारीया यांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले असून पाकिस्तानी उच्चायुक्तही भारतात रुजू होणार नाहीत.
समझोता एक्सप्रेस चालू होऊन आज ४० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. २२ जुलै १९७६ रोजी समझोता एक्सप्रेस सुरु झाली. सुरुवातीला अमृतसर ते लाहोर या ४२ किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन धावायची. समझोता एक्सप्रेस दिल्ली, अटारी आणि लाहोर मार्गावर धावणारी साप्ताहिक ट्रेन आहे. ८० च्या दशकात पंजाबमधील वातावरण बिघडू लागल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वेने अटारीमधून समझोता एक्सप्रेस बंद केली होती. आता ही ट्रेन अटारीपर्यंत जाते.   Print


News - World | Posted : 2019-08-08


Related Photos