जिल्हा परिषद , पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका चार महिने लांबणीवर


वृत्तसंस्था /  मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी पुढील काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुका चार महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यामध्ये ३४ जिल्हा परिषदा असून त्याअंतर्गत ३५१ पंचायत समित्या कार्यरत आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये झाल्या आहेत. जिल्हा परिषदांचे बहुतांशी अध्यक्ष, उपाध्यक्ष, विशेष समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ ऑगस्ट व सप्टेंबर २०१९ मध्ये संपत आहे. तर विधानसभेच्या निवडणुकाही सप्टेंबर- ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत.  
  Print


News - Rajy | Posted : 2019-08-08


Related Photos