डिसेंबरपासून २४ तास करता येणार एनईएफटी , रिझर्व्ह बँकेचा निर्णय


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. पैशांच्या ऑनलाइन देवाणघेवाणीमध्ये महत्त्वाचे माध्यम असणारी एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर) सुविधा येत्या डिसेंबरपासून २४ तास उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारी झाली. या पतधोरणाच्या आढाव्यात आरबीआयने हा निर्णय घेतला. 
एनईएफटी सुविधा सध्या सकाळी आठ ते संध्याकाळी सात या कालावधीत उपलब्ध असते. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी तसेच, प्रत्येक रविवारी ही सुविधा मिळत नाही. थोडक्यात, बँकांचे कामकाज सुरू असतानाच या सुविधेचा सध्या लाभ घेता येतो. मात्र आरबीआयने या सेवेत आमूलाग्र बदल करण्याचे धोरण आखले असून त्यानुसार डिसेंबरपासून ही सुविधा दररोज २४ तास उपलब्ध असेल.  या विषयी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, एनईएफटी सुविधा २४ तास उपलब्ध झाल्यानंतर देशाच्या रीटेल पेमेंट सेवेमध्ये क्रांती होईल अशी अपेक्षा आहे. एनईएफटीच्या माध्यमातून ग्राहकांना दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित करता येते. मोठी रक्कम देवाण - घेवाण करण्यासाठी  एनईएफटीव्यतिरिक्त आरटीजीएस (रीअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम) ही सुविधा उपलब्ध  आहे. या दोन्ही व्यवहारांवरील सेवाशुल्क यापूर्वीच रद्द करण्यात आले आहे. 

   Print


News - World | Posted : 2019-08-08


Related Photos