महत्वाच्या बातम्या

 सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या वतीने आंतरजातीय विवाह संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / सिंदेवाही : नांदगाव मधील प्रेमी युगल मुलगा सूरज दिलीप सहारे रा. नांदगाव तालुका सिंदेवाही व मुलगी द्रौशिका मधुकर चौधरी मु पो. नवेगाव चक, लोणखैरी ता. सिंदेवाही  येथील रहिवासी असून यांचे एकमेकांवर अनेक दिवसांपासून प्रेम होते. सदर प्रेम प्रकरण बाबत दोन्ही मुला मुलींच्या घरी माहिती झाले व मुला मुलींना एकमेकाशी लग्न करायचे असल्याने सामाजिक युवा ब्रिगेड संस्थे कडे विवाह करण्यासाठी अर्ज सादर केला. सदर अर्जावर विचार करून मुला मुलींच्या संपूर्ण कागदपत्राची पडताळणी करून विवाह सोहळ्यास परवानगी देऊन मुला मुलीचे विवाह सामाजिक युवा ब्रिगेड संस्था नवरगाव यांच्या सदस्यगन व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत पार पडला. या मध्ये सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष्य अमोल सेवादास निनावे, शिवसेना बाळासाहेबाची उपतालुका प्रमुख जालिंदर गायकवाड तसेच सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे सदस्य बंटी नैताम, राहुल बोरकर, जगदीश रामटेके, गुडू गोडाने यांच्या उपस्थित पार पडला.





  Print






News - Chandrapur




Related Photos