महत्वाच्या बातम्या

 माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : ये परंपरा का प्रवाह है कभी न खंडित होगा, पुत्रों के बल पर ही मां का मस्तक मंडित होगा ! श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या या वाक्याचे स्मरण करून भारतीय राजकारणातील सुशासनाचे प्रणेते, अत्यंत प्रभावी आणि मुत्सद्दी नेतृत्व, करोडो भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन करीत माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अंब्रिशराव आत्राम अटल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सिरोचा येथील मुख्य चौकात अटल जयंती मोठ्या उत्सवाने साजरा केले.

भाजपाच्या सर्व पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले. यावेळी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos