गडचिरोली येथील केंद्रीय विद्यालयासाठी विशेष बाब म्हणून नवेगाव येथील ३.२० हे. आर जागा मंजूर


- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने राज्‍य मंत्री मंडळाचा निर्णय 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
गडचिरोली येथील केंद्रीय विद्यालयाची  केंद्रीय विद्यालय संगठन यांना वार्षीक नाममात्र १ रुपये  दराने भुईभाडे आकारून ३० वर्षाच्‍या भाडेपट्टाने नियमित अटी व शर्तीवर विशेष बाब म्‍हणून जमीन जागा करण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. आज झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला आहे. गडचिरोली जिल्‍हयाच्‍या पालकमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्‍यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्‍या गडचिरोली जिल्‍हा विकास आढावा बैठकीत सदर विषय जिल्हाधिकाऱ्यांनी त्‍यांच्‍या निदर्शनास आणला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात पाठपुरावा करून विशेष बाब या सदराखाली राज्‍य शासनाची मंजूरी मिळविली आहे.
राज्‍याचे अर्थमंत्री तथा गडचिरोली जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने गडचिरोली जिल्‍हयातील नवेगांव येथील स.क्र. ३२९ आराजी ३१.८० हे.आर पैकी ३.२०  हे.आर इतकी शासकीय जमीन केंद्रीय विद्यालयाकरिता मंजूर करण्यात आली आहे.  

भारत सरकारच्‍या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्‍या अखत्‍यारित येणा-या केंद्रीय विद्यालय संगठन यांच्‍या अंतर्गत येत असलेल्‍या केंद्रीय विद्यालय गडचिरोली या संस्‍थेच्‍या उभारणीकरिता नवेगांव  गडचिरोली येथील एकूण ३.२०  हे. आर इतकी शासकीय जमीन मिळण्‍याबाबत केंद्रीय विद्यालय संगठन यांनी शासनाला विनंती केली आहे. महसुल व वनविभागाच्‍या ३० नोव्हेंबर २०११  च्‍या परिपत्रकानुसार केंद्र शासनाच्‍या विभागांना शासकीय जमिनीची आगावू ताबा देताना प्रचलित बाजार मुल्‍यानुसार त्‍याच्‍या जमिनीच्‍या होणा-या संपूर्ण किंमती एवढे मुल्‍य आकारण्‍यात यावे अशी तरतूद आहे. केंद्रीय विद्यालय गडचिरोली केंद्र सरकारच्‍या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्‍या अखत्‍यारित येत असल्‍याने सदर शासन परिपत्रकानुसार या जमिनीच्‍या प्रचलित शिघ्रसिध्‍द गणकानुसार प्रती हेक्‍टर  ८ लाख  या दराप्रमाणे ३.२०  हे. आर इतक्‍या जमिनीची एकूण रू. २५ लाख ६० हजार  इतकी किंमत शासनजमा होणे अपेक्षित आहे. केंद्रीय विद्यालय संगठन नवी दिल्‍ली यांनी सदर जमिन वार्षीक नाममात्र  १ रुपये  दराने भुईभाडे आकारून उपलब्‍ध करण्‍याबाबत शासनाला विनंती केली होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर विषयाचा पाठपुरावा करून या प्रकरणी विशेष बाब म्‍हणून शासनाची मंजूरी प्राप्‍त केली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-07


Related Photos