ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीत भाजपचा नेमका उमेदवार कोण? , कार्यकर्ते संभ्रमात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली : 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची महाजनादेष यात्रा ५ ऑगस्ट रोजी ब्रम्हपुरी  विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यातील व्याहाड येथे आली होती.  मुख्यमंत्र्यांनी जनतेला मताच्या रुपात आशीर्वाद मागितला.  परंतु आशीर्वाद मागत असतांना ज्या विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री सभेला संबोधित करत होते, त्या क्षेत्राचे माजी आमदार अतुल  देशकर यांच्या नावाचा उल्लेख कुठेही केला नाही. तसेच अनेकजण भाजपकडून आपण आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न आणि जनसंपर्क वाढवत असल्याने नेमका उमेदवार कोण या प्रश्नाने भाजप कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहेत. 
 माजी आमदार अतुल  देशकर हे मागील विधानसभा निवडणुकीत हरल्या नंतरही जनसंपर्क ठेवला आहे. तसेच वसंत वरजूरकर यांनी सुद्धा आपला जनसंपर्क वाढवून भाजपा कडून मलाच तिकीट मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांना सांगत आहेत. तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णा  सहारे यांनी सुद्धा आपला प्रचार सोशल मीडियावर सुरु केला आहे.  खळबळजनक बातमी म्हणजे   राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संदीप गड्डमवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यामुळे  त्यांना ब्रम्हपुरी विधानसभेची भाजपकडून तिकीट मिळू शकते व ते  राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकू शकतात असेही बोलल्या जात आहे. यामुळे  नक्की नवा उम्मेदवार कोण? हा भाजप कार्यकर्त्यांसमोर प्रश्न असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात  एक चर्चेचा विषय  बनलेला आहे. या क्षेत्राचे विद्यमान आमदार काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर आहेत. नुकतीच त्यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने त्यांचे राज्यातील राजकीय वजन वाढलेव आहे.  त्यांची चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणावर पकड मजबूत असल्याने काँग्रेस आणि भाजपा साठी हा मतदार संघ प्रतिष्ठेचा बनला आहे.

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-07


Related Photos