टेकडाताला जवळील ठेंगणा पुल पाण्याखाली, अनेक वर्षांची डोकेदुखी कायम


- परिसरातील संपर्क खंडीत 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा :
  अहेरी उपविभागातील ठेंगणे पुल दुर्गम भागातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. पावसाळ्यात अनेकदा पुल पाण्याखाली येऊन नागरिकांचा तालुुका व जिल्हा मुख्यालयशी संपर्क तुडतो. संततधार पावसामुळे  टेकडाताला  जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या भागातील जनजिवन विस्कळीत झाले. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.
टेकडाताला परिसर जंगल व्याप्त असून या भागातील पर्जन्यमान अधीक आहे.  मागील दहा दिवसापासून संतधार पाऊस कोसळला. पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. नाल्यावरील पुरामुळे सिरोंचा- टेकडाताला बससेवा बंद आहे. याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थी शाळेत जावू शकले नाही. या भागातील नागरिकांना कामकाजासाठी अहेरी अथवा सिरोंचा येथे जावे लागते. परंतू मार्ग खंडीत असल्याने कामकाज विस्कळीत झाले. टेकडाताला येथे आरोग्य केंद्र असून पुराचा फटका आरोग्य सेवेला बसला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात कमी उंचीच्या पुलामुळे मार्ग खंडीत होत असल्याने या भागातील नागरिकांचा संपर्क तुटतो. त्यामुळे टेकडाताला जवळील पुलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. परंतू  या मागणीची  अद्यापही दखल घेण्यात न आल्याने टेकडाताला भागातील नागरिकांना पावसाळ्यात समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्येची शासन व प्रशासन दखल केव्हा घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-07


Related Photos