खासगी अनुदानित शाळेतील अर्धवेळ, रात्रशाळा शिक्षक, ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
खासगी अनुदानित शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्रशाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. राज्यातील अशासकीय खासगी शाळांतील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तसेच अनुदानित व महापालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अशासकीय खासगी शाळांतील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल व रात्रशाळेच्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय प्रलंबित होता. राज्यात १०१२ अर्धवेळ शिक्षक, १४३१ अर्धवेळ ग्रंथपाल तसेच १६५ रात्रशाळांमध्ये काम करणारे ६३० रात्रशाळा शिक्षक, २१९ शिक्षकेतर कर्मचारी असून या सर्वांना जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असल्याचे शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी स्पष्ट केले.
  Print


News - Rajy | Posted : 2019-08-07


Related Photos