माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता होणार अंत्यसंस्कार


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. दरम्यान, मध्यरात्री त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं असून सकाळी ११  वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानीच अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२  ते ३  वाजेपर्यंत त्यांचे  पार्थिव भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ३ वाजता लोदी रोड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.   Print


News - World | Posted : 2019-08-07


Related Photos