अपर आयुक्तांनी घेतला जागतिक आदिवासी दिनाच्या तयारीचा आढावा


- नागपूरात कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
जागतिक आदिवासी दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम ९ ऑगस्ट  रोजी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृह रेशिमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त डाॅ. संदिप राठोड यांनी नुकतीच बैठक घेउन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.
राज्यस्तरीय जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. समन्वय समिती, वित्तीय कामकाज, छपाई, कार्यक्रम प्रसिध्दी, वाहतूक व्यवस्था व संपर्क अधिकारी, भोजन, स्वागत व स्टेज व्यवस्था, सभागृह, निवास व्यवस्था, टंकलेखन, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापन, मिशन शौर्य सत्कार व्यवस्थापन, आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार व्यवस्थापन, विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व कर्मचारी सत्कार व्यवस्थापन, फोटो गॅलरी व प्रदर्शनी, नियंत्रण कक्ष तथा संपर्क आदी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांमधील सदस्य नेमून दिलेल्या  कामाला लागले आहेत.
अपर आयुक्त डाॅ. संदीप राठोड यांनी अपर आयुक्त कार्यालयात सभा घेउन समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना  मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी गठीत केलेल्या समितीमधील सदस्यांना नेमून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचे अवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात कोणतीही उणीव राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  जागतिक आदिवासी दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी जोरदार तयारीला लागले असून राज्यभरातून सुमारे दोन हजार आदिवासी बांधव या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यांच्या व्यवस्थेची तसेच कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू आहे.
बैठकीला अ.ज.प्र.त. समितीचे सह आयुक्त विनोद पाटील, सहाय. आयुक्त दिपक हेडाउ, सहा. आयुक्त महेश जोशी, वरीष्ठ संशोधन अधिकारी मुरलीधर सोनकुसरे, चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी , भामरागडचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे, विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

 
  Print


News - Nagpur | Posted : 2019-08-07


Related Photos