पर्लकोटाच्या पुराने पुन्हा अडविली भामरागडची वाट!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
संततधार सुरू असलेल्या पावसाचा भामरागड तालुक्याला वारंवार फटका बसत असून २ ते ४  ऑगस्ट दरम्यान आलेला पुर ओसरल्यानंतर दोन दिवसांनंतर आज ७ ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळपासून पर्लकोटाच्या पुलावर पाणी चढण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे पुन्हा भामरागडचा संपर्क तुटला आहे.
२९  जुलैपासून भामरागडचा जगाशी सतत संपर्क खंडीत होत आहे. मागील ८ ते १० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुरपरिस्थिती कायम आहे. भामरागड तालुक्यातील अनेक गावे संपर्काबाहेर आहेत. प्रशासनाच्या वतीने खबरदारी बाळगण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. महसूल व पोलिस प्रशासन पुरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तालुक्यातील १०० गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-07


Related Photos