अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस दहा वर्ष सश्रम कारावास


- ५०० रूपयांचा दंड, गडचिरोली येथील जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एन. मेहरे यांनी १० वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.
मंथीर पुनाराम मडावी (४७) रा. सोनपूर ता. कोरची असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत १३ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रीणींसोबत शेताकडे असलेल्या तलावावर असंघोळीसाठी गेली होती. यावेळी आरोपी मंथीर मडावी हा आंघोळीसाठी तलावावर आला. पिडीत मुलीच्या मैत्रीणी आंघोळ करून घरी निघून गेल्या. यावेळी पिडीत मुलगी शेतातील झुल्यावर झुलत असताना आरोपी तिच्याजवळ आला. तिला गॅरापत्ती मार्गालगत झुडूपी जंगलात नेवून तिच्यावर बलात्कार केला. पिडीत मुलीच्या बयाणावरून आरोपीविरूध्द  ६ ऑक्टोबर २०१७ रोजी कोरची पोलिस ठाण्यात कलम ३७६, ५०६ भादंवि ४, ८  बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे साक्षदारांचे बयाण नोंदवून जिल्हा न्यायाधिश आर.एन. मेहरे यांनी पिडीत मुलीचे बयाण व वैद्यकीय अहवाल तसेच इतर परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेवून तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आज ६ ऑगस्ट  रोजी आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांनी केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी काम पाहिले.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-06


Related Photos