भामरागड तालुक्यातील कोतवाल होणार स्मार्ट!


- कोतवाल हा महसूल प्रशासनाचा कणा: तहसीलदार कैलाश अंडील
- १५ ऑगस्ट रोजी मिळणार कोतवालांना टॅब
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा असलेले आणि दुर्गम भागात सेवा देत असलेले भामरागड तालुक्यातील कोतवालांचे काम लवकरच स्मार्ट होणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी १० कोतवालांना टॅबचे वितरण केले जाणार आहे.
भामरागडचे तहसीलदार कैलाश अंडील यांच्या पुढाकाराने तालुक्यातील ४३ कोतवालांपैकी १० कोतवालांना टॅबचे वितरण केले जाणार आहे. उर्वरीत सर्व कोतवालांना लवकरच टॅब उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे काम सुरळीत होण्यासाठी, आदिवासी बांधवांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी तसेच कोतवालांना कामे करणे सोपे व्हावे यासाठी दर्जेदार कंपनीचे टॅब उपलब्ध करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार  आय बाॅल कंपनीचे १० टॅब भामरागड तहसील कार्यालयात पोहचले आहेत. 
कोतवाल  हे महसूल प्रशासनातील महत्वाचा घटक आहेत. त्यांना टॅबचे वितरण केल्यामुळे कार्यालयीन कामे सोयीची होणार आहेत. दुर्गम भागातील नागरीकांना अनेक कागदपत्रे गोळा करण्याचे श्रम वाचणार आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग महाराष्ट्रातील पहिलाच असल्याची माहिती तहसीलदार कैलाश अंडील यांनी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-06


Related Photos