सोन्याचे भाव वधारले : ३७ हजाराचा आकडा केला पार, चांदी ही महागली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने ३७ हजाराचा आकडा पार केला आहे. अमेरिका आणि चीनमधल्या वाढत्या व्यापार तणावामुळे सोनं महाग झाल्याचं बोललं जातं आहे. गुंतवणूकदारांचा सोन्यामधला रस वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.
सोमवारी सोन्याच्या भावात ८०० रुपयांची वाढ झाली होती. सोनं ३६,९७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे. सोनं ३७ हजारापासून फक्त ३० रुपये कमी आहे.
ऑल इंडिया सर्राफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी म्हटलं की, सोन्याचा भाव आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचला आहे. वाढत्या मागणीमुळे चांदीही हजार रुपयांनी वाढून ४३,१०० रुपये प्रति किलो झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे देखील सोनं महागलं आहे.
दिल्लीमध्ये ९९. ९ टक्के आणि ९९. ५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ८०० रुपयांनी वाढून अनुक्रमे ३६,९७०  आणि ३६,८००  रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-08-06


Related Photos