मुख्यमंत्री जिल्ह्यात असतानाच शेतकऱ्याची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  यवतमाळ :
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल ५ ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यात असतानाच दारव्हा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना  घडली. 
अमोल दिगंबर अजमिरे (२७) रा. चानी कामठवाडा, असे त्याचे नाव आहे. लहान असतानाच वडील गेले. त्यामुळे कुटुंबाचा भार अमोलवर होता. मागील चार वर्षांपासून सातत्याने नापिकी होत असल्याने कर्जाचा डोंगर वाढला होता. हे कर्ज कसे फेडावे या चिंतेत असतानाच यंदाही दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. उत्पन्नाची आशाही निम्मी झाली. या काळजीत असतानाच त्याने गळफास घेत आत्महत्या केली.    Print


News - Rajy | Posted : 2019-08-06


Related Photos