नागपंचमीच्या दिवशी पळसगाव पहाडीवरील पिंडीवर अवतरला साप, बघ्यांची गर्दी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी  : 
नागपंचमी हा नागदेवतेचा सण.या दिवशी नागमंदिर व शिवमंदिरात जाऊन नागदेवतेच्या मुर्तीची पुजा केली जाते.परंतु आरमोरी तालुक्यातील पळसगाव महादेव पहाडीवर असलेल्या शंकराच्या पिंडीवर खऱ्या सापाचे दर्शन आज नागपंचमीच्या दिवशी  भाविकांना झाले. यामुळे पुजेसाठी आलेल्या भाविकांनी सापाला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती.
 आरमोरी तालुका मुख्यालयापासुन व कासवी येथुन जवळच असलेल्या पळसगाव येथील महादेवगड पहाडीवर  मंदिर आहे. नागपंचमीच्या दिवशी पळसगाव, कासवी, उसेगाव, अरततोंडी, फरी, झरी, मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव, चिखलीरीठ, जोगिसाखरा, कोकडी, विहिरगाव, पोटगाव,आष्टा पाथरगोटा,रामपुर तसेच आरमोरी व देसाइगंज तालुक्यातील नागरिक पुजेसाठी गेले असता भगवान शंकराच्या पिंडीवर खऱ्या - खुऱ्या सापाचे दर्शन घडले. अनेक वर्षापासुन या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे. या पहाडावर श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी पुराण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी सुद्धा पुराण कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे.   रात्री पुराण वाचन उसेगाव ह.भ. प.श्री. दोनाडकर महाराज यांच्याहस्ते वाचण्यात येते. यावेळी देवस्थान पहाडीचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम, सचिव गणेश मातेरे, अशोक भोयर, श्रीराम ठाकरे, रामजी मानकर,नरहरी पिल्लारे, कवळु मातेरे, रेवनाथ चवारे, देवराव करंबे, सखाराम नखाते,आत्माराम नाकतोडे, हेमचंद्र ढोरे,नाकाडे महाराज ,बळीराम राउत, यादोजी पुराम, राऊत महाराज, आसाराम धनबात व सर्व सद्स्यगण पुराण वाचण्यासाठी उपस्थित असतात. आज ५ ऑगस्ट रोजी सापाचे प्रत्यक्ष पिंडीवर दर्शन झाल्याने भावीकांनी खुपच गर्दी केली.

‘तो’ साप मांजऱ्या जातीचा : सर्पमित्र अजय कुकडकर

पिंडीवरील सापासंदर्भात गडचिरोली येथील सर्पमित्र अजय कुकडकर यांना विचारणा केली असता ‘तो’ साप मांजऱ्या जातीचा असून साप सौम्य विषारी असल्याचे सांगितले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-05


Related Photos