ओबीसी आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
ओबीसी आघाडीच्या वतीने  मुख्यमंत्री  ना. देवेंद्र  फडणवीस यांची भेट घेऊन गडचिराेली जिल्ह्यातील ओबिसी समाजाचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, ५०  टक्केच्या वर ज्या गावात ओबीसी समाज आहे  त्या गावातील पेसा आरक्षण रद्द करुन नान पेसा मधे आनण्यात यावे, गडचिराेली जिल्ह्यातील पोलीस भरती, वन विभागातील भरती मध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण संपूर्ण १९ टक्के करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष खासदार  अशाेक  नेते,  ओबीसी आघाडीचे प्रमुख तथा भाजपा प्रदेश  कार्यकारिणी समीती सदस्य  बाबुराव  काेहळे,  जिल्हा परिषद अध्यक्षा याेगिताताई भांडेकर ,  नगराध्यक्षा  याेगिताताई पिपरे ,  नगरसेवक प्रमाेद पिपरे, भाजप भाजप ओबीसी आघाडी  सरचिटनीस  भाष्कर बुरे आदी उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-05


Related Photos