महत्वाच्या बातम्या

 आश्रम शाळेतील विद्यार्थांना विषबाधा प्रकरणी डॉ. प्रमोद खंडाते यांनी धानोरा रुग्णालयाला दिली भेट 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सोडे गावात शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळेतील दुपारच्या जेवणांनंतर विद्यार्थिनीना मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी व उलटिचा त्रास सुरु झाल्याने तेथील १०९ मुलीनां ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले.
त्यापैकी १४ मुंलीना प्राथमिक उपचार करुन सुटटी देण्यात आली. २० डिसेंबर २०२३ रोजी ४० मुलींना खबरदारीचा उपाय म्हणुन जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले. तसेच २१ डिसेंबर २०२३ ला १७ मुलींना डोकेदुखी असल्याने त्यांचेवर उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले. 

ही माहिती डॉ. प्रमोद खंडाते जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली यांना होताच धानोरा येथे जाऊन विचारपूस करून जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे संदर्भित केले व त्यांना योग्य ते उपचार सुरू केले. 

सद्यस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे ६९ मुली व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे ४० मुली अशा एकूण इयत्ता १ ली ते ४ थीच्या ७ मुली व इयत्ता ४ ते १२ विच्या १०२ मुली अशा एकंदरीत १०९ मुलींवर उपचाराकरीता भरती आहेत. सर्व मुलींचा प्रकृतीत सुधारणा होत असून स्थिर आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos