अंशकालीन स्त्री परीचर संघटनेचे जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन


- अंशकालीन स्त्री परीचरांचे वाढीव मानधन व थकबाकी मिळवून देण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परीचरांचे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर व प्रशासनाच्या सहकार्यामुळे अंशकालीन स्त्री परीचरांच्या माधनात १२०० रूपयांवरून ३ हजारांची वाढ झाली. मात्र वाढीव मानधन व थकबाकी मिळालेली नाही. यामुळे मागणी निकाली काढण्यात यावी, असे निवेदन अंशकालीन स्त्री परीचर संघटनेने जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागणीसंदर्भात आपली भेट घेतल्यानंतर ३१ मे रोजी एप्रिल आणि मे चे पुरवणी वेतन अनुदान वितरीत करण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रास पत्र प्राप्त झाले होते. मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत मानधन खात्यामध्ये जमा झाले नाही. याबाबत काही पंचायत समिती स्तरावर विचारणा केली असता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून बिल सादर केले नयल्याचे निदर्शनास आले. परंतु वित्त विभागाकडून मानधन वाढीचे ग्रॅन्ड अजूनही पंचायत समिती स्तरावर आलेले नाही असे सांगण्यात येत आहे. तसेच बर्याच पि.टी.ए. ला वाढीव थकबाकी काढण्याकरीता पैशांची मागणी होत आहे. अंशकालीन स्त्री परीचरांना अल्पसे मानधन मिळत आहे. त्या कुटूंबाचा उदरनिर्वाह केला जात आहे. त्यातच दोन ते चार महिने मानधन न मिळाल्यास कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा हा प्रश्न उभा ठाकतो. यामुळे वाढीव मानधन व थकबाकी लवकरात लवकर मिळावे यासाठी सबंधितांना आदेश द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 
जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सबंधितांकडून याबाबत माहिती घेवून मागणी लवकरात लवकर निकाली काढू असे आश्वासन दिले. निवेदन देताना संघटनेच्या अध्यक्षा रेखाताई सहारे, कार्यकारी अध्यक्षा उषा मडावी, कार्याध्यक्षा कविता चंदनखेडे, कोषाध्यक्षा तरूणा पंचार, सरचिटणीस भुमिका सेलोटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-05


Related Photos