महत्वाच्या बातम्या

 नमो दिव्यांग शक्ती अभियानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : केंद्र शासनाच्या सिपडा योजनेंतर्गत राज्यात कार्यान्वित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या धर्तीवर नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात दोन दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रासाठी ईच्छूक नॅशनल ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या स्वयंसेवी संस्था तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार उपक्रमासाठी नोंदणी प्रमाणपत्र घेतलेल्या स्वयंसेवी संस्थाची यादी तयार करावयाची आहे. विहीत निकषातील पात्र संस्थांची निवड करून यादी दिव्यांग कल्याण आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या संस्था, दिव्यांग व्यक्तीसाठी विविध योजना, उपक्रम राबविल्याचा अनुभव, संस्थेच्या स्वत:च्या नावे असलेली जागा, इमारत अथवा भाडे कराराने घेतलेली पुरेशी इमारत, सदर इमारत अडथळामुक्त व सुगम्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र, समुपदेशन व थेरपीसाठी तज्ञ व्यक्ती तसेच आवश्यक व पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध असावे. संस्थेच्या बँक खात्याचा तपशील असणे आवश्यक आहे. प्रस्ताव करतांना काही अडचणी आल्यास ०७१५२-२४२७८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos