राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील काश्मीरबाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम ३७० हटवण्यासंदर्भात विधेयक मांडले. त्यानंतर देशभरात जल्लोष झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. तसेच ‘आपला स्वार्थ आणि राजकीय भेद दूर ठेवून या प्रस्तावाचे स्वागत आणि समर्थन केले पाहिजे’, असे म्हणत विरोधीपक्षांना सल्ला देखील देण्यात आला आहे.
आरएसएसच्या अधिकृत हँडलवरून ट्वीट करण्यात आले आहे. “सरकारच्या या धाडसी निर्णयासाठी आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. जम्मू-कश्मीरसह संपूर्ण देशाच्या हितासाठी हे अत्यावश्यक होते. सर्वांनी आपला स्वार्थ आणि राजकीय भेदांपेक्षावर उठून या प्रस्तावाचे स्वागत आणि समर्थन केले पाहिजे” असे मत सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाहसुरेश (भय्याजी) जोशी यांनी व्यक्त केले आहे.  Print


News - World | Posted : 2019-08-05


Related Photos