महत्वाच्या बातम्या

 फसवणुक करणाऱ्या तिन आरोपींना विविध कलमान्वये ७ वर्ष सश्रम कारावास व २२ लाख ५० हजार रु. द्रव्यदंडाची शिक्षा


- गडचिरोली येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचा न्यायनिर्णय ११ डिसेंबर २०२३

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली १८ ऑक्टोबर २०१४ रोजी यातील फिर्यादी वासुदेव गणुजी आलाम रा. रामनगर यांनी आरोपी शबाना जावेद पठाण रा. रामनगर गडचिरोली व ईतर ०७ यांनी फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस स्टेशन मचिरोली येथे रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने यांनी पोलीस निरीक्षक गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली करुन आरोपीतांविरुध्द भरपूर व सबळ पुरावा मिळुन आल्याने दोषारोपत्र दाखल केले असता, आर.सी.सी.नं. १५/२०१४ नुसार स.पू. सदाफळे, मुख्य न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांचे न्यायालयात खटला चालवून सहाय्यक अभियोक्ता यांचे युक्तीवाद ग्राह्य धरुन १९डिसेंबर २०२३ रोजी स.पू. सदाफळे, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयाने आरोपी १) शबाना जावेद पठाण २) जावेंद मेहमूदर्शों पठाण ३) दयानंद गोपाळा निलेकर यांना कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) भा.द.वी. अन्वये दोषी धरुन तिन्ही आरोपींना ०७ वर्ष सश्रम कारावास व २२ लाख ५०हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली. सदर तिन्ही आरोपीतांची चंद्रपुर कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.

सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले तसेच कोर्ट पैरवी पोहवा/२२७७ दिनकर मेश्राम, कोर्ट मोहरर पोअं/३३९१ हेमराज बोधनकर यांनी आरोपीस शिक्षा होणेस कामकाज पाहीले व सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos