मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला रस्ता गडचिरोली पोलीस दलाने श्रमदानातून केला दुरुस्त


- रेगडी - कसनसुर मार्गावरील रस्ता सुरळीत  सुरू 
- २० ते २२ अतिदुर्गम गावांना या मार्गाचा फायदा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  एटापल्ली उपविभागा अंतर्गत येणाऱ्या  कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील  रेगडी -   कसनसुर  रस्ता   अतिमूसळधार पावसामुळे वाहून गेला होता. यामुळे कोटमी हद्दीतील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोंडावाही,एटावाही,गडेरी, बसमंतटोला,इरपगुट्टा यांच्यासहित २० ते २२ गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयापासून तुटला होता. यामुळे येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत होते. या बाबीची दखल घेत पोलीस जवानांनी श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली आहे. 
 कोटमी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राजरत्न खैरनार यांना रस्ता वाहून गेल्याची बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन  अधिकारी व कर्मचारी तसेच CRPF बटालियन १९१ यांच्या साथीने सदर मार्गाची डागडुजी करून घेतली. यामुळे या मार्गावरून वाहतूक पूर्वपदावर येऊन सुरळीत चालू होण्यास मदत मिळाली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे   यांनी  कोटमी पोलीस  व सीआरपीएफ १९१ बटालियनच्या जवानांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-05


Related Photos