पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पोलादीपणा कायम आहे हे जगाला जाणवलं : उद्धव ठाकरे


वृत्तसंस्था / मुंबई :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. अमित शाह यांनी घोषणा करताना कलम ३७० मधील अनुच्छेद क्रमांक एक वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येतील अशी घोषणा केली. यासोबतच अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा प्रस्तावही राज्यसभेत सादर केला.  या निर्णयाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी   स्वागत करताना शिवसेना भवानात पेढे वाटून आनंद साजरा केला .
 उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली. त्यांचंही हे स्वप्न होतं, जे पूर्ण झालं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले.   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं अभिनंदन करताना पोलादीपणा कायम आहे हे जगाला जाणवून दिलं असल्याचं म्हणत कौतूक केलं. आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला. ज्या बेड्या शिल्लक होत्या त्या या सरकारने आज तोडून टाकल्या आहेत, असे ते म्हणाले.    Print


News - Rajy | Posted : 2019-08-05


Related Photos