महत्वाच्या बातम्या

 ठाणे मनपा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाचा अहवाल प्राप्त : मंत्री उदय सामंत 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या आयुक्त, आरोग्य सेवा मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचा गोपनीय अहवाल शासनास प्राप्त झाला असून हा अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

यासंदर्भात सदस्य अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे, सचिन अहीर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

मंत्री सामंत म्हणाले, राज्यातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेशी निगडित अत्यावश्यक पदे तातडीने भरण्याबाबत तसेच औषध पुरवठा नियमितरित्या उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांतील रुग्ण सेवेची निकड, लोकसंख्या तपासून वेळोवेळी श्रेणीवर्धन करण्यात येते. तसेच रुग्णालयासाठी अधिकारी व कर्मचाऱी यांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मार्फत  पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे रुग्ण सेवेमध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होत नाही.





  Print






News - Nagpur




Related Photos