महत्वाच्या बातम्या

 राज्यव्यापी संपाअंतर्गत अंगणवाडी महिलांचे सिटूच्या नेतृत्वात अहेरीत भव्य मोर्चा व सभा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : किमान वेतन, ग्रेज्युटि व पेन्शन मिळविन्यासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबर पासून सीटु च्या नेतृत्वात राज्य व्यापी संप पुकारलेले आहे. या संपाअंतर्गत हजोरो अंगणवाडीना टाळे लावुन महिला आंदोलन करीत आहेत.

याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज २० डिसेंबर ला अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील सर्व प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी अहेरी तहसील कार्यालय पासुन रैली काढुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला व सरकारच्या विरोधात नारे देऊन निवेदन दिले. 

या मोर्चात अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपक आत्राम यांनी भेट देऊन मोर्चाला पाठिंबा दिला व संबोधन केले. उपविभागीय अधिकारी वाघमारे स्वतः मोर्चा स्थळी येऊन मागण्याचे निवेदन स्विकारले.

या मोर्चाचे नेतृत्व कॉ.रमेशचंद्र दहिवडे, कॉ.राजेश पिंजरकर, कॉ.किशोर जामदार, कॉ.अमोल मारकवार, कॉ.अरुण भेलके यांनी केले. या मोर्चात माया नवनुरवार, विठाबाई भट, छाया कागदेलवार, सुनंदा बावने, मोनी विश्वास, मुन्नी शेख, संगिता वडलाकोंडावार, वच्छला तलांडे, जयश्री शेरेकर, सुमन तोकलवार, मंगला दुग्गा, निर्मला नलगुडावार, कल्पना कुमरे ईत्यादी अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाले होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos