महत्वाच्या बातम्या

 वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना घरांच्या चाव्या देणार : मंत्री उदय सामंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना लवकरच घरांच्या चाव्या देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य अश्विनी जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सदस्य जयकुमार गोरे, भीमराव तापकीर यांनी भाग घेतला.

मंत्री सामंत म्हणाले, वाल्हेकरवाडी येथे ७९२ सदनिकांचा गृह प्रकल्प करण्यात येत आहे. यामध्ये वन रूम किचन सदनिका ३७८, वन बीएचके सदनिका ४१४ आहेत. गृह प्रकल्पात पाणी, वीजेची व्यवस्था करण्यात आली आहे. या गृह प्रकल्पात दुसरी लॉटरी २४ जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे २०१६ मध्ये काम सुरू झाले. हे काम २०१९ अखेरीस पूर्ण करणे आवश्यक होते. याबाबत कंपनीला १ कोटी ६० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये कंपनीला ५८ लाख रुपये सूट देण्यात येवून १ कोटी १० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही सर्व कारवाई शासन नियमानुसार करण्यात आली. या प्रकल्पात नियमबाह्य काम झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरुवातीलाच ८ ते १० महिने उशिरा सुरू झाले.





  Print






News - Nagpur




Related Photos