महत्वाच्या बातम्या

 बाबरगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण करणार : मंत्री संजय राठोड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मौजे बाबरगाव ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत दिली.

यासंदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी राठोड बोलत होते. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

यावेळी राठोड म्हणाले, मौजे बाबरगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील शिवना नदीवर २०१५-१६ मध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामामुळे बंधाऱ्यात समाधानकारक पाणी अडविल्याने परिसरातील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये पावसाच्या पुरामुळे हा  हा बंधारा वाहून गेल्याने परिसरातील सिंचन क्षेत्र  कमी झाले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यासाठी या बंधाऱ्याच्या  दुरुस्तीच्या  कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात येईल.





  Print






News - Nagpur




Related Photos