आपल्या जनादेशाचा आशिर्वाद मागण्यासाठीच जनादेश याञा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस


- देसाईगंज येथे सभा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
मागील पाच वर्षात सत्तेत आल्यापासून समाजातील सर्वंच घटकांना सोबत घेऊन संपुर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. आपण टाकलेला विश्वास  आम्ही सार्थकी लावु शकलोत किंवा नाही, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवुन सर्व सामाण्य गोरगरीबांचा विकास आम्ही सार्थकी लावला किंवा नाही? पाच वर्षात सर्वसामान्य गोरगरिबांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार देण्याचा प्रयत्न करून या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही डाग लागु दिला नसल्यानेच पुढच्या पाच वर्षा करीता परत नव्याने जनादेश देऊन असाच विकास करण्याची संधी द्याल, हिच अपेक्षा बाळगून तुमच्या आशिर्वादाचा जनादेश मागण्यासाठी तुमच्यासमोर आलो असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले. 
  देसाईगंज येथील आदर्श  महाविद्यालयच्या प्राणंगणात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित महा जनादेश याञे निमित्त आयोजित सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके, विधान परिषद सदस्य गीरीश व्यास, खासदार अशोक नेते, आमदार  राजकुमार बडोले, अरविंद सावकार पोरड्डीवार,आमदार कृष्णा गजबे, प्रकाश सावकार पोरड्डीवार,किसन नागदेवे, जि.प.कृषी सभापती नाना नाकाडे, न.प.अध्यक्षा शालु दंडवते, उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, सभापती मोहन गायकवाड, बाबुराव कोहळे,जिल्हा महामंञी सदानंद कुथे,आरमोरी विधानसभेतील सर्व भाजपा तालुका अध्यक्ष आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे म्हणाले की कुणी तुळजाभवानीला दैवत मानून तुळजापुरची वारी करतात तर कोणी विठ्ठलाला दैवत मानून पंढरपुरची वारी करतात.माञ आम्ही आमच्या महाराष्ट्रातील मतदारांना आपले दैवत मानुन या राज्याचा राजा नव्हे तर राज्याचा सेवक म्हणून मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोगा आपल्या समोर मांडुन जनादेश घेण्याकरीता आलो आहे,असेही ते बोलताना म्हणाले.

आपले सरकार शेतकऱ्यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे

       राज्यात पुर परिस्थिती असो की दुष्काळ असो,धान पिकावर मावा तुडतुड्याचा प्रकोप झाला असो की कापसावर बोंड अळीच असो,शेतक-यांना बोनस देण्याचा प्रश्न असो की शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आर्थिक मदत करून शेतक-यांना सन्मानाने जगवण्याचा प्रयत्न केला असुन यापुढेही हातात सत्ता आल्यास   कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येत्या दोन वर्षात दुपटिने उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारच, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी उपस्थित शेतक-यांना दिली असुन कर्जमाफिचा लाभ शेवटच्या घटकापर्यत पोहचवल्याशिवाय योजना बंद करणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.

ओबीसीचे आरक्षण पुर्ववत करणार

      गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात जिथे ओबीसींची संख्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे अशा गावांना नाॅन पेसा क्षेत्रात समाविष्ट करून ओबीसींवर होत असलेला अन्याय दुर सारून आरक्षण पुर्ववत करणार असल्याचे सांगत येत्या काही दिवसातच राज्यपालांच्या स्वाक्षरीने तसा अध्यादेश जारी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच ओबीसींच्या ज्वलंत समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी स्वतंत्र ओबीसी मंञालयाची निर्मिती करण्यात आली असुन यासाठी तीन हजार कोटी रुपयाचे पॅकेज देण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-04


Related Photos