अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते मिशन शक्तीचे उद्घाटन


- जिल्ह्याची विकास गाथा सिंहावलोकन  या कॉफी टेबल बुकचे विमोचन 
- जलशक्ति कार्यक्रमात जलपुरुष राजेंद्र सिंह व अमीर खान यांचे संबोधन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच युवकांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याची कमालीची क्षमता असल्याची जाणीव मिशन शौर्य उपक्रमामुळे झाली. मिशन शौर्यच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट सर केले होते. यामुळे जिल्ह्यातील युवकांमध्ये जिद्द आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. या आत्मविश्वासाला योग्य दिशा देण्यासाठी तसेच २०२४  या वर्षाच्या ऑलिंपिकमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी पदक आणावे, यासाठी वित्त, नियोजन, वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात मिशन शक्ती हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्याच्या  सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच क्रीडा  व शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुरू केला आहे.  बल्लारपूर शहरातील एफडीसीएम ग्राउंड येथे सुप्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांच्या हस्ते मिशन शक्ती या अभियानाची रीतसर सुरुवात झाली आहे.
मिशन शक्तीचा मुख्य उद्देश २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू पदकाचे मानकरी ठरावेत. याकरिता जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, ऑलिंपिकच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करणे, तसेच उत्कृष्ट प्रशिक्षकांची नेमणूक करून खेळाडूंना सुयोग्य मार्गदर्शन करणे, असे विविध उद्देश मिशन शक्तीच्या माध्यमातून साध्य करण्यात येणार आहे. बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा व चिमूर येथील क्रीडा संकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून आज बल्लारपूर येथील क्रीडा संकुलाचे अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, क्रीडामंत्री आशिष शेलार व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. मिशन शक्तीमध्ये वेटलिफ्टिंग, धनुर्विद्या, नेमबाजी, जलतरण, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक व बॉक्सिंग अशा आठ खेळांचा समावेश करण्यात आला असून या क्रीडा संकुलामध्ये या खेळाच्या सरावासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सायंकाळी ४  वाजता आमिर खान व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बल्लारपूर शहरात आगमन झाले  असून त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी पुतळ्याचे अनावरण तसेच बल्लारपूर स्टेडियमची पाहणी करण्यात येणार आली . त्यानंतर मुख्य मार्गदर्शनाचा कार्यक्रम असलेल्या एफडीसीएम ग्राउंडवर सर्व पाहुण्यांचे आगमन होणार झाले  या कार्यक्रमामध्ये क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे. मार्गदर्शन कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके तसेच क्रीडामंत्री आशिष शेलार, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व अभिनेता आमिर खान हे उपस्थित विद्यार्थी व खेळाडूंना संबोधित केले  तसेच चंद्रपूर जिल्ह्यात  मागील पाच वर्षात झालेल्या विकासकामांची माहिती देणाऱ्या सिंहावलोकन या कॉफीटेबल बुकचे अनावरण,  तसेच  जिल्ह्यात राबवल्या गेलेल्या  मिशन सेवा, मिशन शौर्य  व मिशन शक्ती या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण पाहुण्यांच्या हस्ते झाले आहे.माऊंट एव्हरेस्ट शिखर वर चढणारया विरा ना. व jeet परिक्षेत देशात प्रथम आलेल्या कार्तिकेय गुप्ता यांचा सम्मान करून सत्कार करण्यात आला 
जगात नावलौकिक असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत मेडल जिंकण्याची महत्वकांक्षा निर्माण करणाऱ्या मिशन शक्ती व जिल्ह्याला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणाऱ्या जलशक्ति सोहळ्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-04


Related Photos