पवनी तालुक्यात अतिवृष्टी , २६९ मिलिमीटर पावसाची नोंद


- गोसेखुर्द  धरणाचे ३३ ही दार उघडले 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी
: भंडारा जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे पवनी तालुक्‍यामध्ये अतिवृष्टी झाली.   पवनी तालुक्यात सर्वाधिक २६९ मिलिमीटर  पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे गोसे धरणाचे ३३ ही दार उघडण्यात आले आहेत. यापैकी २२ दार हे अर्धा मीटर तर अकरा दार हे एक मीटरने सुरू केले गेले आहेत . यामधून ४६१३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
काल दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती.  मात्र रात्री बारानंतर पावसाने पवनी तालुक्यामध्ये तांडव केला . रात्रभर मुसळधार पाऊस बरसल्याने तब्बल २६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. शेतात सर्वत्र पाणीचं पाणी दिसत आहे. जणू पवनी तालुक्यात सर्वत्र फक्त तलावच आहेत. या पावसाच्या पाण्यामुळे नागपूर मार्ग बंद पडलेला आहे.  मरू नदीला आलेल्या पुरामुळे हा मार्ग बंद झालेला आहे. तसेच पवनी तालुक्यातील जवळपास २५ ते ३० गावाशी संपर्क तुटलेला आहे.  पवनी तालुक्यातील पहाडी वर भूस्खलन होत आहे. तर एका पोल्ट्री फार्म मध्ये सात ते आठ फूट पाणी शिरल्याने जवळपास १०० ते १५०  कोंबड्याचा  मृत्यू झाला आहे.  आसगाव येथील चाळीस घरांमध्ये पाणी शिरले आहे. आसगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल च्या पटांगनात ३ ते  ४ फुट पाणी असल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली . वलनी गावात ५  घरात  पाणी शिरले आहे, तर कोंढा गावातही घरात पाणी शिरल्याने लोकांचे नुकसान होत आहे. पवनी शहरातील अमन नगर पाण्याखाली आलेला आहे.  बामणी सावरला या गावांमध्येही पाणी शिरले  आहे.  बोरगाव जवळील नाल्यावर पूर आल्याने पवनी ते लाखांदूर मार्गही बंद करण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्यात वाढ झाल्यामुळे धरणाचे ३३ दार उघडण्यात आले आहेत त्यापैकी २२ दरवाजे अर्धा मीटरने तर ११ दार एक मीटरने उघडण्यात आले असून ४७१३ क्युमेक्स पाणी या मधून विसर्ग होत आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सुरुवातीचे आकडे असून पुढच्या काही वेळा मध्ये अजून बरेच नुकसान झालेले आहे.  त्याची माहिती पुढे येईल.  मागील वीस-पंचवीस दिवसापासून वरुण राजा नाराज होता. मात्र मागील एका आठवड्यात तब्बल ३ वेळा पवनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि रात्री तर एवढी मोठी कृपा केली त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-08-03


Related Photos