नागपूर विभागात सरासरी ६०.३० मिमी पाऊस, भामरागड तालुक्या १३६.९० मिमी पावसाची नोंद


- भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सर्वाधिक २९६ मिमी अतिवृष्टी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस                
प्रतिनिधी /  नागपूर  :
  नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी 60.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सर्वाधिक 269 मि.मी., लाखांदूर तालुक्यात 91.40 मि. मी. तर साकोली 80.40 मि.मी. पावसाची नोंद झाली. तसेच नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात 154.30 तर उमरेड तालुक्यात 83 मि. मी. पावसाची नोंद झाली. 
गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी 84.33 मि. मी., अर्जुनी मोर  84.28 मि. मी. , सालेकसा तालुक्यात 79.67 मि. मी., गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यात 73.47 मि. मी., चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही 170.30 मि.मी, चिमूर 140.60 तसेच बल्लारशाह, मूल, सावली, वरोरा, ब्रम्हपुरी, नागभीड या तालुक्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 136.60 मिमी तर वडसा तालुक्यात 104 मि.मी. एवढी अतिवृष्टी झाली असून गडचिरोली, धानोरा, चामोशी्रआरमोरी, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात 65.11 मि. मी. पासाची नोंद झाली आहे.
  विभागात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे.
चंद्रपूर  77.21 (610.32), गडचिरोली 77.18 (728.94), भंडारा 77.06 (540.54), गोंदिया 61.74 (489.63)  वर्धा  34.75 (478.68)  तर सर्वात कमी  पाऊस नागपूर जिल्ह्यात 33.85 (512.94) पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.  नागपूर विभागात दिनांक 1 जून 2019 ते 3 ऑगस्ट 2019 पर्यत सरासरी 560.18 मिलीमीटर पाऊस पडला आहे. 

   Print


News - Nagpur | Posted : 2019-08-03


Related Photos